गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
Read More
रेशनवर किती धान्य मिळाले, कोणते मिळाले; आता थेट मोबाईलवर मेसेज येणार!
रेशनवर किती धान्य मिळाले, कोणते मिळाले; आता थेट मोबाईलवर मेसेज येणार!
Read More
थंडीची लाट अधिक तीव्र होणार! डॉ. रामचंद्र साबळे यांचा सविस्तर हवामान अंदाज
थंडीची लाट अधिक तीव्र होणार! डॉ. रामचंद्र साबळे यांचा सविस्तर हवामान अंदाज
Read More
गेहूं की फसल में पहला पानी पर डाले ये 2 खाद, खेत कल्लो से भर
गेहूं की फसल में पहला पानी पर डाले ये 2 खाद, खेत कल्लो से भर
Read More
कापूस दरात अखेर ८००० चा टप्पा पार! वर्धा, जालन्यात तेजीचा बार, शेतकऱ्यांच्या नजरा दरवाढीकडे!
कापूस दरात अखेर ८००० चा टप्पा पार! वर्धा, जालन्यात तेजीचा बार, शेतकऱ्यांच्या नजरा दरवाढीकडे!
Read More

नागपूरमध्ये सोयाबीनला ८००० चा विक्रमी दर? हा ‘बिजवाई’चा भाव, सर्वसामान्य शेतकरी मात्र ४५०० वरच!

राज्यातील सोयाबीन बाजारात आज नागपूर बाजार समितीतील ८१५० रुपयांच्या विक्रमी दराने मोठी खळबळ उडवून दिली आहे. मात्र, बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा उच्चांकी दर सर्वसामान्य सोयाबीनला मिळालेला नसून, तो केवळ ‘बिजवाई’ म्हणजेच पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून खरेदी केल्या जाणाऱ्या विशेष प्रतीच्या सोयाबीनला मिळाला आहे. ही खरेदी अत्यल्प (केवळ ३ क्विंटल) असल्याने, या दराचा सर्वसाधारण बाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे, या विक्रमी दरांमुळे शेतकऱ्यांनी दिशाभूल करून घेऊ नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.

ADS किंमत पहा ×

दुसरीकडे, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सोयाबीनला मिळणाऱ्या दराचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. लातूर सारख्या प्रमुख बाजारपेठेत १०,७६५ क्विंटलची मोठी आवक होऊन सर्वसाधारण दराने ४५०० रुपयांची समाधानकारक पातळी गाठली आहे. यासोबतच अहमदपूरदेवणी आणि उमरखेड येथेही दर ४५०० रुपयांच्या पुढे गेले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळाला आहे. मात्र, अमरावती येथे मोठी आवक होऊनही दर ४२२५ रुपयांवरच स्थिरावल्याने, बाजारातील दरांची विषमता कायम आहे. वाढलेला उत्पादन खर्च पाहता, शेतकऱ्यांना किमान ५००० रुपयांच्या सर्वसाधारण दराची अपेक्षा आहे.

Leave a Comment