ला-निना स्थितीमुळे थंडी वाढण्याची शक्यता
प्रशांत महासागरामध्ये सध्या सौम्य ला-निना (La Niña) स्थिती असून, डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळी महिन्यांत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी असणे हे थंडी वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. यासोबतच इंडियन ओशन डायपोल (IOD) सध्या ऋण स्थितीत असून, हिवाळ्यात त्याचाही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडी अधिक तीव्र होऊ शकते.
विदर्भ आणि मराठवाड्यात अधिक परिणाम
यंदाच्या हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी) महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा खाली राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अधिक गारठणार असून, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचे दिवस अधिक काळ टिकून राहण्याचा अंदाज आहे. या भागांमध्ये तीव्र थंडीच्या लाटा (Cold Wave) येण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही थंडीचा जोर कायम राहील. दुसरीकडे, अरबी समुद्रात ‘बॅड टच’ नावाचे चक्राकार वारे सक्रिय असून, ते थंडीच्या लाटेवर परिणाम करू शकतात.
















