हरभरा तण नियंत्रणातील धोके
हरभरा पीक १५ ते २० दिवसांचे झाल्यावर तण नियंत्रणासाठी काही शेतकरी बकऱ्या सोडण्याचा पर्याय निवडतात. तर काही शेतकरी टोप्रामीझॉन (उदा. टिंजर किंवा इलाईट) या मक्यासाठी शिफारसित असलेल्या तणनाशकाचा वापर करतात. मात्र, हे तणनाशक वापरल्यास हरभरा पिकाला मोठा धक्का बसतो, त्याची वाढ तात्पुरती थांबते आणि उत्पादनात घट होते, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नुकसान भरून काढण्यासाठी आवश्यक काळजी
टोप्रामीझॉनसारख्या तणनाशकाचा वापर केल्यामुळे जर पिकाला शॉक बसला, तर शेतकऱ्यांनी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत, पिकाचे नुकसान टाळण्यासाठी, शेतकऱ्यांनी एकरी २५ ते ३० किलो युरिया फेकून द्यावा आणि लगेच स्प्रिंकलरने पाणी देणे आवश्यक आहे. पाणी दिल्यानंतर हरभऱ्याला लवकर सावरण्यासाठी इसाबियन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची (मायक्रोन्यूट्रिएंट्स) फवारणी करावी.
















